Home महाराष्ट्र एसटीच्या महिला कर्मचारी अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार- गोपीचंद पडळकर

एसटीच्या महिला कर्मचारी अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार- गोपीचंद पडळकर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपासून आंदोलन पुकारले आहे. तसेच अजूनही हे आंदोलन सूरूच आहे.

हे ही वाचा : “मंत्रीपद हुकल्यामुळं नानांनी मानसिक संतुलन गमावलं; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची टीका”

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मागील 11 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. मात्र, सरकारकडून अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीकडे लक्ष दिलं जात नाही. यानंतर पडळकरांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

एसटीच्या महिला कर्मचारी दुपारी चार वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर जात परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार असल्याचं पडळकरांनी यावेळी म्हटलं. तसेच सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन नेतृत्वहीन झालंय, आम्ही बोलायचं कुणाशी. अरे इथं तुमचे हजारो बाप आणि आया बसल्या आहेत, त्यांच्याशी येऊन बोला ना’, असंही पडळकरांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

अमृता फडणवीस यांचं नवं गीत आज प्रदर्शित; ट्वीट करत दिली माहिती

…तर हे काळीज नसलेलं सरकार आहे; गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

रोहित-राहुलकडून न्यूझीलंडचा धुव्वा; भारताने न्यूझीलंडला 7 विकेटसने पराभव करत मालिका जिंकली