Home क्रीडा रोहित-राहुलकडून न्यूझीलंडचा धुव्वा; भारताने न्यूझीलंडला 7 विकेटसने पराभव करत मालिका जिंकली

रोहित-राहुलकडून न्यूझीलंडचा धुव्वा; भारताने न्यूझीलंडला 7 विकेटसने पराभव करत मालिका जिंकली

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रांची : आजच्या भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 7 विकेटसने पराभव करत मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली.

हे ही वाचा : मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अन्यायाची जबाबदारी टाळता येणार नाही- बाळासाहेब थोरात

न्यूझीलंडने  प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावत 153 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 21 चेंडूत 34 धावा केल्या. तर मार्टिन गुप्टील व डॅरेल मिचेलने प्रत्येकी 31 धावा केल्या. तर भारताकडून हर्षेल पटेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, दीपक चहर व अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दरम्यान, धावांचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 17.2 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केलं. भारताकडून रोहित शर्मा, के.एल.राहुलने धमाकेदार सूरूवात करताना भारताला 117 धावांची सलामी दिली. रोहित शर्माने 36 चेंडूत 55 धावांची खेळी केली. तर के.एल.राहुलने 49 चेंडूत 65 धावांची खेळी केली. त्यानंतर दोघेही ठराविक अंतराने बाद झाले. त्यानंतर आलेला सुर्यकुमार यादवही केवळ 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर वेेंकटेश अय्यर (11 चेंडूत नाबाद 12 धावा), रिषभ पंत (6 चेंडूत नाबाद 12 धावा) यांनी भारताला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“जेंव्हा जेंव्हा शरद पवारांचं सरकार येतं, तेंव्हा दंगली घडतातच”

“किरीट सोमय्यांचे नेक्स्ट टार्गेट आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर; 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”

भाजप ए.स.टी. कामगारांची डोकी भडकवत आहे; शिवसेनेचा आरोप