आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात सरकारचं अस्तित्वच दिसत नाहीये. एक मुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री मानतो. पण आपल्या स्वतच्या पलिकडे पाहायला तयार नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : …तर अख्खा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही; भाजपच्या ‘या’ नेत्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा
राज्यात प्रत्येकजण स्वत: मुख्यमंत्री समजतो ही चांगली गोष्ट आहे. ही लोकशाहीची ताकद आहे, असं सांगतानाच केंद्रातील मोदी सरकारमध्ये मात्र, कोणत्याही मंत्र्याला ते मंत्री आहेत असं वाटत नाही. एवढंच काय खासदारांनाही ते खासदार आहेत, असं वाटत नाही, असा पलटवार संजय राऊतांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, या राज्याचा प्रत्येक नागरिक मुख्यमंत्री आहे. जेव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आहेत तेव्हा पासून 11 कोटी लोकांना वाटतं मी मुख्यमंत्री आहे. मी सत्ताधारी आहे असं लोकांना वाटतं. लोकशाहीतील ही मोठी घटना आहे. मोदी सरकारमध्ये कोणत्याही मंत्र्याला तो मंत्री आहे असं वाटत नाही. खासदार आहे असं वाटत नाही, असा टोला राऊतांनी यावेळी फडणवीसांना लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; तर्कवितर्कांना उधाण”
“राष्ट्रवादीला मोठा धक्का; गोंदियाच्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश”