आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लातूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने न्यायिक विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ” जिल्हा विधी प्राधिकरण शिबिराचे “आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे करण्यात आले होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय लातूर मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहीती लोकांपर्यंत पोहचवीन्याच्या दृष्टीने शिबिरस्थळी स्टॉल लावण्यात आले.
हे ही वाचा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती नाजूक; पुण्यात उपचार सुरू
लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्टॉलला भेटी देऊन योजनांची माहिती करून घेतली. यादरम्यान विविध योजनांची माहिती देतांना वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक श्री. केंद्रे, तालुका समन्वयक श्रीराम शिंदे, नागेश जाधव, मनोज मोरे, अमोल मुळे, गंगाधर जोगदंडकर, प्रणिता सुर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी अभिनव गोयल (मुख्य कार्यकारी अधिकारी), निखिल पिंगळे (लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक), श्रीमती, सुरेखा कोसमकर या उपस्थित मान्यवरांनी स्टॉलला भेटी दिल्या.
महत्वाच्या घडामोडी –
परळीत माफियाराज सूरू आहे; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
“टी-20 वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाचा वर्चस्व; न्यूझीलंडला नमवत पहिल्यांदाच आयसीसी ट्राॅफीवर कोरलं नाव”
मनसेचा शिवसेनेला धक्का; नेरूळमधील युवा शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश