Home महाराष्ट्र दंगलखोरांना थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील अशी तिन्ही पक्षांना भीती- चंद्रकांत...

दंगलखोरांना थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील अशी तिन्ही पक्षांना भीती- चंद्रकांत पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काल मुस्लिमांनी अमरावती जिल्ह्यात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी जमावावर लाठीमार केला होता. त्यामुळे शहरात प्रचंड हिंसाचार झाला होता. यावर  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात दंगली घडत आहे. दंगलखोरांना थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील असं तिन्ही पक्षांना वाटत असावं. राजकारणात आल्यावर याचे गणित कळेल. गृहमंत्री आजारपणातून बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल आहेत. पण सरकार बाहेरून चालवणारे आहेत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

हे ही वाचा : “अमरावतीतील वातावरण तापलं; सलग 4 दिवस संचारबंदी, इंटरनेट सेवा बंद”

केवळ पाच टक्के मुस्लीम त्यांच्या नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून हिंसक आंदोलन करतात त्यावर तुम्ही टीका पण करणार नाही का? प्रत्येक विषयात तुम्ही भाजपचे नाव घेता. तुमच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. एसटी कामगारांवर इतका अमानवीय अन्याय महाराष्ट्रारात कधीही झाला नाही. यामध्ये भाजपाचा हात असेल तर सत्तेत बसलेले तिन्ही पक्ष भाजपला रोखण्यासाठी समर्थ आहात. तुम्ही तिघे एकत्र असूनही दुबळे आहात आणि आम्ही श्रेष्ठ आहोत असे तुम्हाला म्हणायचे आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे पण शांततेने करा. अमरावतीमधल्या कालच्या घटनेचा रिपोर्ट पोलिसांनी प्रामाणिकपणे द्यावा. माजी मंत्र्यांचे, सामान्य माणसांची कार्यालये फोडण्यात आली. त्यामुळे भाजपाने नागरिकांच्या इच्छेमुळे बंदचे आवाहन केले होते. आज पोलीस लाठ्या चालवतील पण काल जी दुकाने फोडली त्यांच्यावर लाठ्या नाही चालवल्या,  असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवार-उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून ते एकच आहेत”

कंगणा रणाैतविरूद्ध शिवसेनेचं आंदोलन; कंगणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

…तर आज बाळासाहेबांनी संजय राऊतांच्या थोबाडीत दिली असती; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल