भाजपची उलटी गिनती सुरू- संजय राऊत

0
201

मुंबई : भाजपने शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीला त्यांच्या संघटनेला NDA मधून बाहेर काढले. आता भाजपची उलटी गिनती सुरू, असं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली.

ज्या NDA चे अस्तित्वच मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले त्या NDA मधून म्हणे शिवसेनेस बाहेर काढले. आम्ही संपादकीय मधून सत्य मांडलं आहे. महाराष्ट्रात भाजपाला उभं करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले.

सत्तास्थापनेचा गोंधळ हा शिवसेनेच्या मनात नाही. तो केवळ माध्यमांच्या मनात आहे, असं म्हणत राऊतांनी माध्यमांवरही टीका केली आहे.

दरम्यान, एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सत्तास्थापनेचा पेच अद्यापही सुटल्याचं दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here