आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्याचा बेमुदत संप सुरु आहे.
कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्याने ‘ना काम, ना दाम’ यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा एका मंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरेंची एसटी कर्मचाऱ्यांसोबत कोणती चर्चा झाली, याबाबतची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
हे ही वाचा : खासदार अमोल कोल्हे शिवसेनेत परतणार?; राजकीय चर्चेला उधाण
राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. याचसंदर्भात राज यांनी या बैठकीच्या सुरुवातीलाच चिंता व्यक्त केली. ‘मी आत्महत्या करणाऱ्यांचे नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट असेल,’ असं राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाला सांगितलं.
सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला जातो तोच एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करावा. ते जर दिलं तर ते महत्त्वाचे पाऊल ठरेल. स्वतः राज ठाकरे या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालतील, त्यानंतर सरकारशी बोलणं झालं की मग कर्मचाऱ्यांशी बोलेन असं राज म्हणाले आहेत, असं नांदगावकर यांनी यावळी सांगितलं. तसेच राज ठाकरे कर्मचाऱ्यांसोबत आहे, अशी ग्वाहीसुद्धा नांदगावकरांनी यावेळी दिली.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात मनसे कायदेशीर लढाई लढण्यास तयार असून, राज ठाकरे मदत करणार आहेत., असंही नांदगावकर यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
विधान परिषदेसाठी भाजपकडून ‘या’ नेत्याचं नाव फायनल
माझी आपणास हात जोडून विनंती आहे की…; मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन
“न्यूझीलंडची टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये एन्ट्री; इंग्लंडचा 5 विकेट्सने उडवला धुव्वा”