Home महत्वाच्या बातम्या खासदार अमोल कोल्हे शिवसेनेत परतणार?; राजकीय चर्चेला उधाण

खासदार अमोल कोल्हे शिवसेनेत परतणार?; राजकीय चर्चेला उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टने मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. आपण घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू… नव्या जोमाने, नव्या जोशाने!!, असं अमोल कोल्हेंनी म्हटलं होतं. या वरून ते परत शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अमोल कोल्हेंच्या या संकेतामुळे राष्ट्रवादीच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर अमोल कोल्हे यांनी परत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला तर तो राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जाईल.

हे ही वाचा : विधान परिषदेसाठी भाजपकडून ‘या’ नेत्याचं नाव फायनल

सिंहावलोकनाची वेळ : गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचारसुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू… नव्या जोमाने, नव्या जोशाने!, असं अमोल कोल्हे म्हणाले होते.

दरम्यान, 2019 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. ते या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडूनही आले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

माझी आपणास हात जोडून विनंती आहे की…; मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन

“न्यूझीलंडची टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये एन्ट्री; इंग्लंडचा 5 विकेट्सने उडवला धुव्वा”

महाविकास आघाडीचं सरकार मराठी द्रोही, महाराष्ट्र द्रोहींचं आगार- चित्रा वाघ