Home महाराष्ट्र माझी आपणास हात जोडून विनंती आहे की…; मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन

माझी आपणास हात जोडून विनंती आहे की…; मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या आंदोलानाची दखल घेत एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं . सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “न्यूझीलंडची टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये एन्ट्री; इंग्लंडचा 5 विकेट्सने उडवला धुव्वा”

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. उच्च न्यायालयासमोरदेखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची  पावले उचलली आहेत. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी विशेष समिती नेमण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. गेल्या दोन वर्षांपासून या विषाणूचा आपण सामना करीत आहोत. कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा, अशी माझी नम्र विनंती आहे. दरम्यान विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावले. गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडीचं सरकार मराठी द्रोही, महाराष्ट्र द्रोहींचं आगार- चित्रा वाघ

गरिबांना लुटायचं आणि उद्योगमंत्र्यांनी खिसे भरायचे हा मोदींचा एककलमी कार्यक्रम- नाना पटोले

शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याने वाढवलं भाजपचं टेन्शन; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी यशस्वी खेळी