Home महाराष्ट्र शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याने वाढवलं भाजपचं टेन्शन; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी यशस्वी खेळी

शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याने वाढवलं भाजपचं टेन्शन; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी यशस्वी खेळी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी व्यूव्हरचना रचून भाजपचे टेन्शन वाढवले आहे. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे यांनी एक प्रस्ताव ठेवत भाजपच्या चिंतेत वाढ केली.

मुंबई महापालिकेतील प्रभागरचनेवरून भाजप आणि शिवसेनेत वाद सुर असतानाच राज्य सरकारने आजच्या बैठकीत आणखी एक निर्णय घेत भाजपच्या जखमेवर मीठ चोळले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. या प्रस्तावाला शिवसेनेच्या सूरात सूर मिळवत महाविकास आघाडी सरकारच्या इतर पक्षातील मंत्र्यांनी मान्यता दिली. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या 236 अशी होणार आहे. या निर्णयाची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हे ही वाचा : जळगाव जिल्हा बँकेत एकनाथ खडसेंची ‘मोनोपॉली’; काँग्रेसचा आरोप

मुंबई महानगरपालिकेत निर्वाचित सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. ही संख्या 2001 च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे. 2011 च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहीली. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 2001 ते 2011 या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये 3.87 टक्के इतकी वाढ झाली आहे.

लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण याबाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या 236 होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“महाविकास आघाडी सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रति असलेल्या संवेदना पूर्णपणे मेल्या आहेत”

नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; भाजपची मागणी

“टायगर अभी जिंदा है; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीच्या आमदाराला संदेश; चर्चांना उधाण”