Home महाराष्ट्र विधान परिषदेसाठी भाजपकडून ‘या’ नेत्याचं नाव फायनल

विधान परिषदेसाठी भाजपकडून ‘या’ नेत्याचं नाव फायनल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान आणि 14 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून या निवडणूकीसाठी औरंगाबाद भाजपचे शहर आणि जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्या उमेदवारीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निश्चित केल्याची माहिती पुढे आली आहे.

संजय केनेकर यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस प्रदेश भाजपातर्फे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला करण्यात आली आहे. त्यासाठी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव महाराष्ट्र भाजपतर्फे निश्चित करून शिफारस केली आहे.

हे ही वाचा : माझी आपणास हात जोडून विनंती आहे की…; मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अनुमतीने केंद्रीय निवडणूक समितीकडून संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. निवडणूक अर्ज भरण्याची मुदत 16 नोव्हेंबर असून केंद्रीय समितीकडून नाव निश्चित झाल्यावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या सहा जागांमध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे, अकोला, नागपूरचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा रणसंग्राम बघायला मिळणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“न्यूझीलंडची टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये एन्ट्री; इंग्लंडचा 5 विकेट्सने उडवला धुव्वा”

महाविकास आघाडीचं सरकार मराठी द्रोही, महाराष्ट्र द्रोहींचं आगार- चित्रा वाघ

गरिबांना लुटायचं आणि उद्योगमंत्र्यांनी खिसे भरायचे हा मोदींचा एककलमी कार्यक्रम- नाना पटोले