आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
आजच्या टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात न्यूझीलंड विरूद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव करत टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला.
हे ही वाचा : महाविकास आघाडीचं सरकार मराठी द्रोही, महाराष्ट्र द्रोहींचं आगार- चित्रा वाघ
न्यूझीलंडने टाॅस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट गमावत 166 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अलीने 37 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी केली. तर डेव्हिड मलानने 30 चेंडूत 41 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊथी, अॅडम मिल्ने, ईश सोधी व जिमी नीशमने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने हे लक्ष्य 19 व्या षटकात पूर्ण केलं. न्यूझीलंडकडून सलामीवीर डॅरेल मिशेलने नाबाद 47 चेंडूत 72 धावांची खेळी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. तर जिमी नीशमने 11 चेंडूत 27 धावा करत न्यूझीलंडच्या विजयात महत्तवाचं योगदान दिलं. तर इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, लियाम लिविंगस्टोनने प्रत्येकी 2, तर आदिल रशीदने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
गरिबांना लुटायचं आणि उद्योगमंत्र्यांनी खिसे भरायचे हा मोदींचा एककलमी कार्यक्रम- नाना पटोले
शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याने वाढवलं भाजपचं टेन्शन; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी यशस्वी खेळी
शिवेंद्रराजेंची भेट झाली नाही तरी त्यांना गाठणारच; उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा