Home जळगाव जळगाव जिल्हा बँकेत एकनाथ खडसेंची ‘मोनोपॉली’; काँग्रेसचा आरोप

जळगाव जिल्हा बँकेत एकनाथ खडसेंची ‘मोनोपॉली’; काँग्रेसचा आरोप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी शैलजा निकम आणि विनोद पाटील या काँग्रेसच्या उमेदवारांना उमेदवारी दिली. मुळात काँग्रेसचे उमेदवारही एकनाथ खडसे ठरवतात. एवढी ‘मोनोपॉली’ जिल्‍हा बँकेत सुरू आहे. एकनाथ खडसे यांना हवे ते मिळवण्याचा प्रयत्न असल्याने त्यांनी काँग्रेसचा उमेदवार ठरवला,  असा आरोप करत काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : “महाविकास आघाडी सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रति असलेल्या संवेदना पूर्णपणे मेल्या आहेत”

जिल्हा परिषदेतील शिक्षण व आरोग्य समिती सभापती दालनात सदर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला भाजपचे कार्यकर्ते तथा शिक्षण सभापती स्वींद्र पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार, विकास वाघ आदी उपस्थीत होते. यावेळी डी. जी. पाटील बोलत होते.

जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादीने प्रमुख उमेदवारांना उमेदवारी न देता पक्षात नसलेल्यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने सर्व उमेदवारांना माघार घ्यायला सांगितले. काँग्रेसशी काहीही संबंध नसताना शैलजा निकम यांना उमेदवारी दिली. मंत्री, आमदार यांना अनेक कामे असताना केवळ खुर्ची हवी म्हणून जिल्हा बँकेत उमेदवारी करत आहेत. यामुळे नाराज असलेल्या उमेदवारांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केल्याचं यावेळी डी. जी. पाटील यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या घडामोडी –

नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; भाजपची मागणी

“टायगर अभी जिंदा है; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीच्या आमदाराला संदेश; चर्चांना उधाण”

अनधिकृत बांधकामांतून पैसे ओरबाडायचे, मग सोयी-सुविधा का नाही?; मनसेचा प्रशासनाला सवाल