Home महाराष्ट्र अनधिकृत बांधकामांतून पैसे ओरबाडायचे, मग सोयी-सुविधा का नाही?; मनसेचा प्रशासनाला सवाल

अनधिकृत बांधकामांतून पैसे ओरबाडायचे, मग सोयी-सुविधा का नाही?; मनसेचा प्रशासनाला सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण : कल्याणमधील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य झाल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसे नेते राजू पाटील हे प्रचंड संतप्त झाले असून त्यांनी यावेळी केडीएमसी प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.

हे ही वाचा : शिवशाही नव्हे, मोगलाई सुरू आहे, हम करे सो कायदा चालणार नाही; चित्रा वाघ यांचा सरकारला इशारा

अनधिकृत बांधकामांतून पैसे ओरबाडायचे. मात्र 27 गावांना सुविधा द्यायची नाही. या भागातील एकही रस्ता महापालिकेने केलेला नाही. आमदार निधीतून रस्ता करावा लागत आहे. भूमिपुत्रांची जागा आरक्षणासाठी घेतली जाते आणि गावकऱ्यांवर जादा मालमत्ता कर लावला जात आहे. हे अन्यायकारक आहे, असं राजू पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या पिसवली गावात माजी भाजपा नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागात आमदार निधीतून रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

वेळ आल्यावर तुमचीही काळी संपत्ती आज ना उद्या बाहेर काढणार; नवाब मलिकांचा अमृता फडणवीसांना इशारा

“शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घेतली भेट; चर्चांना उधाण”

जिल्हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्ट; महाविकास आघाडीसमोर ‘या’ नव्या पॅनलचं आव्हान