विदर्भातही मनसेचा जोर वाढला; अनेकांचा मनसेत प्रवेश

0
579

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंद्रपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष वाढीसाठी तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षात जोरदार इन्कमिंगला सुरुवात झाली आहे.

निवडणुकांच्या तोंडावर मोर्चेबांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहे. राज्यभरात ते दौऱ्यावर जात असून मनसेला याचा मोठा फायदा होत आहे. अशातच राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे नगरसेवक सचिन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मनसेच झेंडा हाती घेतला आहे.

हे ही वाचा : शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही; चंद्रकांत पाटलांचा टोमणा

दरम्यान, दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील ‘पिपला’ या गावी अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. पक्षाच्या वतीने सर्वांचे स्वागत आणि भावी राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“ग्रामीण भागातही राज ठाकरेंची क्रेझ, गडचिरोलीतील अनेक युवकांचा मनसेत प्रवेश”

“…तर पुढचे मुख्यमंत्रीही उद्धव ठाकरेच होणार”

‘या’ महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी लढणार एकत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here