आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : सध्या भाजपा शिवसेनेशी युती करण्याच्या कोणत्याही परिस्थितीत अनुकूल नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेनेशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता कार्यकर्त्यांनाही वाटत नाही भाजपा-शिवसेना युती झाली पाहिजे. म्हणूनच, भाजपा-शिवसेना युतीसाठी सर्व दारे बंद झाली आहेत, असं वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
हे ही वाचा : “दादरा नगर हवेलीत मोदींचं नाव न घेता भाजपला माती चारली, ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले”
2024 ची निवडणूक भाजपा पूर्ण शक्तिनिशी लढेल आणि स्वबळावर जिंकेलसुद्धा. अंडी उबवणे आणखी काय काय… आपण काय उदाहरण देतो, याचेही भान आता त्यांना राहिलेले नाही, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय.
दरम्यान, अंडी उबवण्याचे त्यांचे काय आहे, हे माहिती नाही. पण कोंबडीच जर वांझोटी असेल तर दुसरी नवीन पिल्लं मोठी होणारच आहे. त्यामुळे आता भाजपा-शिवसेना युती होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
पालघरमध्ये होणार विमानतळ; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा
भारताची विजयी आतषबाजी; अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय
काँग्रेसने सत्तेत असताना गरिबांच्या भावनांशी खेळ केला- पंकजा मुंडे