आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना, उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.
भाजप-शिंदे गटातील जागा वाटपावरून उद्धव ठाकरेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
हे ही वाचा : सत्ता गेल्याचं दु:ख नाही, मात्र…; मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
आताचे भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आहेत. त्या बावनकुळेंनी सांगितलं की, आम्ही मिंधे गटाला फक्त 48 जागा देणार आहोत. पण आहो बावनकुळेसाहेब, तुमच्या नावाएवढ्या किमान 52 जागा तरी द्या. त्यांची काहीतरी लायकी ठेवा. एवढ्या असंख्य जिवंत माणसांचं प्रेम त्याग करून ते तुमच्या खोक्यात घुसलेले सगळे मिंधे आहेत. त्यांना तुम्ही 48 जागांमध्येच आटोपणार का?, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.
दरम्यान, आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी महाराष्ट्रातील भाजपला विचारतोय, तुम्ही (भाजप) मिंध्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहात का? असं असेल तर आम्ही मिंध्यांना नेता मानून निवडणुका लढणार आहोत, हे भाजपने जाहीर करावं. जर भाजपाला असं वाटत असेल की, आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. तर तुमचे 52 नव्हे तर 152 कुळं खाली उतरली तरी कुणी शिवसेना तोडू शकत नाही. प्रयत्न करून बघा., असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे एकत्र येणार? चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
मोठी बातमी! ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आमच्या संपर्कात; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट