Home नाशिक सत्ता गेल्याचं दु:ख नाही, मात्र…; मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

सत्ता गेल्याचं दु:ख नाही, मात्र…; मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना, उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.

सत्ता गेल्याचं दु:ख नाही. सत्ता गेल्यानंतर चांगलं काम करणारं सरकार गद्दारी करुन तुम्ही पाडलंत आणि निर्लज्जासारखा छत्रपतींचा भगवा हातात गद्दार नाचत आहात. गद्दार हा शिक्का आयुष्यभर पुसला जाणार नाही. जिकडे तुम्ही जाल तिकडे गद्दार म्हणूनच ओळखले जाल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे एकत्र येणार? चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

गद्दार, ढेकूंसाठी तोफेची गरजच नसते. आज बऱ्याच वर्षांनी मालेगावत आलेलो आहे. मालेगावकरांना धन्यवाद देतोय. मध्ये जगभरात कोरोना संकट आलं होतं. दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता. एक मुंबईतील धारावी आणि दुसरं मालेगाव. रोज रिपोर्ट येत होते. पोलीस बंदोबस्ताला येत ते सगळे कोरोनाग्रस्त. कुणाचा थांगपत्ता लागला नाही. मी मालेगावातील धर्मगुरुंशी बोललो. तुम्ही तेव्हा सहकार्य केलं नसतं तर मालेगाव वाचलं नसतं. मी घरात बसून सांगितलं ते तुम्ही ऐकलं त्यासाठी धन्यवाद मानतो. तुम्ही मला कुटुंबातील एक माणूस मानलं. हे गद्दारांच्या नशिबात असेल असं मला वाटत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आमच्या संपर्कात; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

तुम्ही चुकीच्या पद्धतीने सेक्स करता’; कोल्हापूरात एका डाॅक्टरानं रेकाॅर्ड केल्या 80 महिलांच्या व्हिडीओ क्लिप

एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराला फडणवीसांचा धक्का; विधानपरिषदेत केली ‘ही’ मोठी घोषणा