पंढंरपूर : राज्यातील जनता करोनाच्या संकटातून जात असताना विविध मंदिर समित्या सरकारच्या मदतीला धाऊन आल्या आहेत. अशातच आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासंदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी माहिती दिली आहे.
राज्य शासनाला आर्थिक मदत करणे ही काळाजी गरज आहे, ही बाब विचारात घेवून पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला 1 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. असं विठ्ठल जोशी यांनी सांगितलं.
दरम्यान, हा निर्णय घेण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुढाकार घेतला आहे. तर समितीच्या इतर सदस्यांनी या निर्णयाला सहमती दर्शवली आहे अशी माहिती जोशी यांनी दिली.
महत्वाच्या घडामोडी-
या संकटाच्या काळात राज सुद्धा मला सातत्यानं फोन करतोय- उद्धव ठाकरे
कोरोना ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा राज्यसरकारचा निर्णय- अजित पवार
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवसापासून होणार प्रक्षेपण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच भारतवासियांना आर्थिक मदतीचं आवाहन