रिक्षावाल्याच्या लावणीवर तुम्हीही व्हाल फिदा; व्हिडिओ होतोय व्हायरल

0
142

पुणे : बारामती शहरात रिक्षा चालवणाऱ्या बाबा कांबळे यांचा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा या लावणीवरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बारामतीजवळच असलेल्या गुणवडी येथील रहिवासी बाबा कांबळे हे बारामती शहरात रिक्षा चालवतात. दोन-तीन दिवसांपूर्वी ते मालेगाव रस्त्यावर ऑटोमध्ये गॅस भरण्यासाठी गेले असताना लाईट नसल्याने काही वेळ थांबावे लागेल असं त्यांना सांगण्यात आलं मग आपल्या सहकाऱ्यांचं मनोरंजन करण्याच्या हेतूने त्यांनी लावणीवर ठेका धरला. त्यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्यांचा व्हिडिओ केला.

लोकांनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर बाबा कांबळे यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल होऊन हजारो लोकांपर्यंत पोहोचला.

दरम्यान तो व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाल्या नंतर आपण कधीही एवढी प्रसिद्धी मिळेल अशी अपेक्षा केली नव्हती अशी भावना व्यक्त करत यापुढेही संधी मिळाली तर आपण नक्कीच पूरेपूर प्रयत्न करू, असं बाबा कांबळे यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते”

IPL चौदावा हंगामाचे वेळापत्रक जाहीर ; ‘या’ दोन संघात होणार पहिला सामना

ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड

“उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here