मुंबई : शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यादेश काढण्याचा पर्याय सूचवला आहे. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा तुमची कधीच नव्हती. जर होती तर याआधी द्यायला हवं होतं. आता भाजपाने दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर तुम्ही अध्यादेश काढायला निघालात, हे म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही. ते 50 वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही. सलग 15 वर्ष राज्यात तुमचं सरकार होतं. तुम्ही स्थापन केलेल्या बापट समितीने मराठा समाजाला मागास म्हटलं होतं. यावर मतदान झालं, पण त्यात फेटाळण्यात आलं. 15 वर्षात मराठा आरक्षण दिलं नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
ही असंवेदनशीलता नव्हे तर काय? राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण; स्वत: फेसबुक पोस्ट करत दिली माहिती
शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे- संजय राऊत
“फार मोठी चूक करताय; सुचक वक्तव्यासह कंगना रणाैतने मुंबई सोडली”