आपण लढणार आपण जिंकणार; मुख्यमंत्र्याचा व्हिडीओतून ‘पॉवरफूल’ संदेश

0
269

मुंबई : महाराष्ट्रच नाही तर सगळा देश करोनाविरोधातली लढाई लढतो आहे. अशात महाराष्ट्राने देशाला आदर्श घालून द्यावा असं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. तेच मनोदय त्यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून आता लोकांसमोर मांडला आहे. आपण लढणार आपण जिंकणार असा पॉवरफूल संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे.

करोनाविरोधात लढणाऱ्या लढवय्यांसाठी म्हणजेच आपले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य विभागातले कर्मचारी, पोलीस, स्वच्छता विभागातले कामगार यांचे मनोधैर्य वाढवणारा व्हिडीओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समोर आणला आहे.

दरम्यान, आरोग्य सुविधा, करोनाच्या चाचण्या, रुग्ण आढळल्यास तो विभाग सील करणं, विशेष काळजी घेतली जाणं हे सगळं काम ठाकरे सरकारकडून केलं जातं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

रमझानच्या कालावधीमध्ये घरातच थांबून नमाज पठणं करा- शरद पवार

सांगलीकरांनी पुन्हा करुन दाखवलं, सांगली जिल्हा करोनामुक्त

…तो पर्यंत महाराष्ट्रात हिंदूंनाच मार खावा लागणार का?; निलेश राणेंचं अनिल देशमुख यांच्यावर टिकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here