मुंबई : सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. यावरुन आता भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी विचार करत होतो… मला शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहतोय. वकील साहेबांची तर काल लागली… आता नोटीस कोण बनवणार?”, असं ट्विट करत नितेश राणेंनी अनिल परब यांना टोला लगावला आहे.
I was wondering..
Am I still goin to get a defamation notice from the most eligible n highly educated bachelor in town ?
Eagerly waiting..
Vakil sahab ki toh kal lag gayi..ab notice kon banayega?— nitesh rane (@NiteshNRane) April 8, 2021
दरम्यान, जो नियम अनिल देशमुख यांना लागतो, जो नियम सिंचन घोटाळ्याच्या वेळी अजित पवारांना लागला, जो नियम आदर्श घोटाळ्याच्या वेळी अशोक चव्हाण यांना लागू होतो, तोच अनिल परब यांनाही लागतो. तेंव्हा त्यांनी शपथा खाल्ल्या नव्हत्या. ते चौकशीला सामोरे गेले. त्यामुळे
वकील आहात, लहान शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नयेत, असा हल्लाबोलही नितेश राणेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
शपथा घेऊन सुटका होत नसते- अतुल भातखळकर
“कडवट शिवसैनिक दुसरं काहीही करेल, पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही”
…म्हणजे सचिन वाझेंचं पत्र भाजप कार्यालयातूनच आलं असावं- हसन मुश्रीफ
“गिरणी कामगार नेते दत्ता ईसवलकर यांचं निधन”