Home महाराष्ट्र …म्हणजे सचिन वाझेंचं पत्र भाजप कार्यालयातूनच आलं असावं- हसन मुश्रीफ

…म्हणजे सचिन वाझेंचं पत्र भाजप कार्यालयातूनच आलं असावं- हसन मुश्रीफ

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लिहिलेलं पत्र हे भाजपने दिलं असावं असं माझं म्हणणं आहे. असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की आणखी एक मंत्री राजीनामा देईल. त्यांचं वक्तव्य आणि सचिन वाझे यांचं पत्र हा निश्चितच योगायोग नाही. वाझे यांचं पत्र हे भाजपने दिलेलं पत्र असावं असं माझं म्हणणं आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, वाझे हे परमबीर सिंग यांनाच रिपोर्ट करत होते. वाझे ऑफिसला येताना बीएमडब्ल्यू आणि मर्सिडिजने येत होते तर मग कारवाई का केली नाही? तुरुंगातून पत्र लिहिणं हे योग्य नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावेल, असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“गिरणी कामगार नेते दत्ता ईसवलकर यांचं निधन”

” ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी लागतील, सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही”

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत- अनिल परब

मागेल त्याला ‘कोरोना व्हॅक्सिन’ द्या; अशोक चव्हाण यांची मागणी