Home महाराष्ट्र योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही मुंबईत उत्तर भारतीयांसाठी कार्यालय उभारणार, आता आदित्य ठाकरे...

योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही मुंबईत उत्तर भारतीयांसाठी कार्यालय उभारणार, आता आदित्य ठाकरे म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली कंबर जोरदार कसली आहे. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत उत्तर भारतीयांसाठी भाजप कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे आगामी निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची टीका होत आहे. यावरून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला वाटतं, अशी अनेक सदनं आणि कार्यालयं देशातील अनेक राज्यांमध्ये असतात. यात एक गोष्ट महत्त्वाची आहे की, जेंव्हा कोविडचा काळ होता, देशातील अनेक राज्यांमधील कामगार महाराष्ट्रात होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आम्ही सर्वांनी सर्वच लोकांची काळजी घेतली., असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : “हिंदुत्वाचा खरा वारसदार कोण, हे लवकरच कळेल”

कोविड काळात राज्यात इतर देशातील नागरिक असो की इतर राज्यातील कामगार असो, आम्ही सर्वांची काळजी घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात कोणीही इतर राज्यातील लोकांची काळजी करण्याची गरज नाही. इथं सर्व ठीक सुरू आहे आणि सर्वजण देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करत आहेत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी योगी आदित्यनाथांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“प्राण जाये पर वचन न जाए, हे आमचं हिंदुत्व, आम्हांला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही”

“प्राण जाये पर वचन न जाए, हे आमचं हिंदुत्व, आम्हांला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही”

भाजपा खासदाराची राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणत टीका; आता मनसेकडून प्रतिक्रिया, म्हणाले…