आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचाराचं कुरण झाली असून तिथं आपले खिसे भरायचे एवढंच सुरु आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली होती. त्याला आता उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सातारा शहराच्या व शहरवासीयांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सुरु केलेली इनोव्हेटीव्ह सातारा ही योजना, समाजाची आणि समाजहित साध्य करुन घेण्याची चिरकाल चालणारी योजना आहे. ज्या लोकांना इनोव्हेटीव्ह सातारा या शब्दाचा अर्थ आणि शब्दाचे स्पेलिंग अचूक सांगता येणार नाही त्यांनी आमच्या इनोव्हेटीव्ह सातारा या उपक्रमाविषयी काही बोलू नये, असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.
हे ही वाचा : रोहित शर्मा-सुर्यकुमार यादवची मॅचविनिंग खेळी, भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय
लोकांच्या गतीमान सोयी , सुविधांसाठी कोणत्या योजना राबविणे, लोकहिताची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय.. आम्ही भ्रष्टाचार केला आहे, असंही उदयराजेंनी म्हटलं आहे
निवडणुका जवळ आल्या की खासदार उदयनराजेंना इनोव्हेटिव्ह साताऱ्याचं स्वप्न पडतं. सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचाराचं कुरण झाली असून नुसतं तिथं चरायचं आणि आपले खिसे भरायचे एवढंच सुरु आहे, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते.
महत्वाच्या घडामोडी –
ईडीवर बोलू नको, बिडी प्यायला लावतील; नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला
“…म्हणून नारायण राणेंनी भाजपासमोर लाचारी पत्कारली ”; शिवसेनेचा पलटवार
नारायण राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे; आता संजय राऊत, म्हणतात…