मुंबई : ठाकरे सरकारमधील कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी., असं ट्विट करत दिलीप वळसे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन. धन्यवाद!, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.
धन्यवाद!— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 29, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मानलं पवार साहेब आपल्याला.. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले; निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा
मुख्यमंत्र्यांबाबत नको ते शब्द वापरल्याने नारायण राणेंविरोधात तक्रार दाखल
“जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं”
अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर चाकूहल्ला; मुंबई पोलिसांनी आरोपीला केलं अटक