आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लेखिका आणि लघुपटकार डॉ. अंजली कीर्तने यांचं प्रदीर्घ आजाराने शनिवारी माहीम येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या.
शनिवारी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि मातोश्री कवयित्री पद्मिनी बिनीवाले आहेत.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! भाजपच्या गोटात धुसफूस; ‘या’ नेत्याचा पत्रकार परिषद घेत राजीनामा
कीर्तने यांनी ‘डॉ. आनंदीबाई जोशी- काळ आणि कर्तृत्व’, ‘पाऊलखुणा लघुपटाच्या’, ‘गानयोगी पं. द. वि. पलुस्कर’, ‘बहुरूपिणी दुर्गा भागवत-चरित्र आणि चित्र’, ‘चेरी ब्लॉसम’, ‘माझ्या मनाची रोजनिशी’, ‘कॅलिडोस्कोप’, ‘हिरवी गाणी’, ‘ मनस्विनी प्रवासिनी’, ‘आठवणी प्रवासाच्या’, ‘वेडा मुलगा आणि शहाणी माकडे’, ‘अभिजात संगीताचे सुवर्णयुग’ आदी पुस्तके लिहिली.
दरम्यान, त्यांनी डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यावर चरित्रपट तयार केला. त्यानंतर दुर्गा भागवत, पं. पलुसकर यांच्यावरही चरित्रपट तयार केले.
महत्त्वाच्या घडामोडी –
अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका
मोठी बातमी! शरद पवार आज रात्री अमित शाह यांची भेट घेणार
डंके की चोट पर सांगतो की…; गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य