आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : राज्याच्या ग्रामीण भागात सरंपचपदावर विराजमान होऊन यशस्वीपणे आपले कर्त्यव्य पार पडणाऱ्या महिला सरपंचाचा आघाडी सरकार विशेष आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मान करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या नावाने हा आदर्श महिला सरपंच पुरस्कार देण्यात येणार आहे.
राज्याचे ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा औरंगाबादेतील महिला सरपंच परिषदेत केली. सरंपच परिषदेदरम्यान सत्तार यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.
हे ही वाचा : किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल; काँग्रेस नेत्याची माहिती
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, राज्यातील महिला सरपंचांना प्रोत्साहन म्हणून आदर्श महिला सरपंच हा पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार मीनाताई ठाकरे यांच्या नावाने 25 हजार ते 5 लाखापर्यंतचे एकूण पाच पुरस्कार महिला सरपंचांना देण्यात येणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट, चर्चांना उधाण”
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपची माघार; बँक महाविकास आघाडीच्या हातात