आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राज्यातील सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला आहे. अशातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्य सरकारावर टीका केली आहे.
राज्य सरकारमध्ये काय चाललय हे सरकार मधल्यांनाही कळत नाही. अन जनतेलाही कळत नाही. काही जिल्हे आम्ही दारूमुक्त केले होते. चंद्रपूरमध्ये आम्ही दारूबंदी केली, हे सरकार सत्तेवर आलं नाही तोपर्यंत दारुविक्री पुन्हा सुरू केली. आता केवळ चंद्रपूरला दारु सुरु करून थांबले नाहीत, तर सगळ्या महाराष्ट्रात पानटपरीवर वाईन विकायला लागलेत. असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्र मास्क मुक्त होणार का?; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
आज वाईन विकायला लागेलत, उद्या बियर विकतील, पुढे दारु विकायला लागतील. या सरकारला उत्पन्न पाहिजे असेल तर अनेक उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पानटपरीवर दारु विकून किंवा दुकानात विकून पैसा उभा हे या राज्य सरकारला पचनी पडलेलं नाही. महाराष्ट्रातील संस्कृती अशी नाहीये, राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला पाहिजे अजित पवार काय बोलले मला माहिती नाही पण वाईन मध्येही अल्कोहोल असतं. उद्या ते असही म्हणतील की महिलाही पिल्या तरी चालतील. आमच्या सरकारने कोणत्याही राज्यात दारु विक्रीचा निर्णय घेतलेला नाही आणि घेणारही नाही, असंही रावसाहेब दानवे म्हणले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“आगामी निवडणुकीत मनसे भाजपसोबत युती करणार की नाही, याचा निर्णय केवळ राज ठाकरे घेतील”
भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत; नवाब मलिकांचा मोठा गाैफ्यस्फोट
‘वाईन आणि दारूमध्ये जमीन-आस्मानाचा फरक, मात्र काहींनी…’, अजित पवारांचा भाजपाला टोला