आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसेच्या दादरमधील शिवाजी पार्कवरच्या दीपोत्सवात मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले. तेव्हापासून युतीच्या चर्चा होत आहेत. त्यावर आता स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसेची युती होणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : …तेंव्हा तुम्ही काय करत होता?; राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना सवाल
राजकारण हेल्थी राहिलं पाहिजे. समविचारी पक्षांची संख्या वाढत चालली असल्याचंही शिंदेंनी यावेळी म्हटलं. ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्याचं लोकार्पण नागपूर ते शिर्डी नोव्हेंबर महिन्यात होईल. हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे, त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सर्वसामान्य प्रवासी, या महामार्गाने नागपूरला येतील, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी बोलताना दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
आम्ही भोंग्याचा आवाज सहन करतोय ना, मग तुम्हीही…; ‘त्या’ ट्विटवर मनसे नेत्याचा धमकीवजा इशारा
“युतीबाबत बोलताना चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मनसेसोबत युती करायची असेल, तर…”
आमची मनं जुळली आहेत, बाकी सर्व जुळून येईल; मनसेच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य