सुप्रिया सुळेंचीही हकालपट्टी करणार का?; अजित पवारांनी, एकाच वाक्यात विषय संपविला, म्हणाले…

0
395

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अजित पवार यांनी बंड करत राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यां बंडानंतर आता दोन्ही गटांकडून एकमेकांवर कारवाई व्हायला सुरूवात झाली आहे.

अजित पवार यांनी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. जयंत पाटील यांच्याऐवजी सुनिल तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

ही बातमी पण वाचा : शिंदे जर मुख्यमंत्री असतील, तर मला मंत्रीपदही नको; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा खळबळजनक दावा

शरद पवार यांनी कार्यकारी अध्यक्ष असलेले, प्रफुल पटेल यांना निलंबित केलं आहे. यावरून माध्यमांनी, अजित पवारांना, तुम्हीही कार्यकारी अध्यक्ष असलेल्या सुप्रिया सुळेंना निलंबित करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेंव्हा हकालपट्टी करण्याकरता आमचा पक्ष चाललेला नाही. बेरजेचं राजकारण आम्ही करत आहे, बेरजेचं राजकारण आम्ही करत आहे. इकडे आम्ही हकालपट्टी करायला बसलो का? असं उत्तर अजित पवारांनी यावेळी दिलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“आता ठाकरे बंधू एकत्र येणार?; मनसेच्या बैठकीत मनसैनिकांचा राज ठाकरेंसमोरच सूर”

अजित पवारांना मोठा धक्का! अमोल कोल्हेंनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले…मी शरद पवारांसोबत

भाजपाच हिंदुत्व बेगडी; अजित पवार यांच्यासोबत असलेल्या या नेत्याचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here