Home पुणे पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर पाठवणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर पाठवणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी 10 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार असून, त्यापैकी 4 जागा भाजप लढवणार आहे. अशातच भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काल माध्यमांशी बोलताना, मी विधानपरिषदेवर जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं म्हणाल्या होत्या. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजाताई, या आमच्या वरिष्ठ नेत्या आहेत. ज्यावेळी एखादी निवडणूक येते तेंव्हा त्यांचं नाव चर्चेत येणे साहजिकच आहे. त्यात काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण कुठल्याही पदासाठी त्या पात्र आहेत. त्यासंदर्भातील निर्णय त्यांना आणि आमच्या हायकमांडला घ्यायचा आहे., असं फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीची मोठी खेळी; देहूतील भाजपच्या ‘या’ एकमेव आमदारानं हाती बांधलं घड्याळ”

दरम्यान, आमच्या सर्वांकडून त्यांच्या नावाला पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे, त्यांना पाठिंबा द्यायला काहीच अडचण नाही. ते आणि आमचे हायकमांड मिळून याबाबत निर्णय घेतील, असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“सोनईत शिवसेनेची ताकद वाढली; अनेक युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

सुरूवात जरी तुमची असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते; ईडी प्रकरणावरून दीपाली सय्यद कडाडल्या

ईडीची कारवाई आधी कशी कळते; स्वत: किरीट सोमय्यांनी दिलं उत्तर, म्हणाले…