मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; थेट अजित पवारांकडून ऑफर

0
474

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांना आज राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं दिसत आहे. अशातच अजित पवार यांनी वसंत मोरेंना थेट राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्याने खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : …तर त्यांची जीभ छाटली पाहिजे; शिवरायांवरील वक्तव्यावरून रूपाली पाटील आक्रमक

अजित पवार आणि वसंत मोरे यांची पुण्यातील एका विवाह सोहळ्यात भेट झाली. यावेळी अजित पवारांनी बोलताना, ‘तात्या, कधी येताय, वाट पाहतोय !’ असे म्हणत वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.

दरम्यान, मोरे यांनीही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आल्याचे मान्य केलं. मात्र मी मनसे पक्ष सोडणार नाही, असेही मोरेंनी यावेळी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजप नेत्यांकडून शिवरायांचा अवमान सूरूच; आता रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, म्हणाले…

“ठरलं तर! भीमशक्ती-शिवशक्ती युतीवर उद्या शिक्कामोर्तब?; ठाकरे-आंबेडकर उद्या करणार घोषणा?”

राज्यपालांनंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड यांचं शिवाजी महारांबद्दल वादग्रस्त विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here