आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : भाजप नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अखेर या चर्चांवर खडसे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत याबाबतची आपली भूमिका व्यक्त केली.
ही बातमी पण वाचा : “प्रकाश आंबेडकर राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत”
ज्या पक्षासाठी इतके केले. 2014 पासून माझा, ज्या पक्षात छळ झाला. अनेक चौकशी लावण्यात आल्या, त्या पक्षात आता मी पुन्हा जाणं शक्य नाही, असं खडसेंनी यांनी स्पष्ट केलंय. भाजप मध्ये ज्यांच्यावर मोठे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पक्षात येऊन स्वच्छ झाले. अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मला विधानपरिषद च सदस्य बनवून राजकीय विजन वासातून मला बाहेर काढले. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न नाही”
दरम्यान, विनोद तावडे आणि आम्ही गेले अनेक वर्षे सोबत काम करत होतो. भाजपमध्ये विनोद तावडेंचे योगदान खूप आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना वाटत असावे की जुन्या लोकांनी पक्षात यावे. कर्नाटकचा पराभवावरून त्यांना असे वाटले असावे की जुन्या नेत्यांनी पक्षात परत यावे, असं खडसे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
औरंग्याचे फोटो जर कुणी झळकवत असेल तर माफी नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
“राष्ट्रवादीचं ठरलं तर मग! शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढविणार”
भाजप नेते गोपीचंद पडळकरांकडून, शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका, म्हणाले…