Home महाराष्ट्र औरंग्याचे फोटो जर कुणी झळकवत असेल तर माफी नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

औरंग्याचे फोटो जर कुणी झळकवत असेल तर माफी नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  अहमदनगरमध्ये काल एका कार्यक्रमात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत असल्याचा प्रकार घडला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

‘औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर हे महाराष्ट्रात कदापि मान्य केले जाणार नाही. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. या देशात, महाराष्ट्रात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “राष्ट्रवादीचं ठरलं तर मग! शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढविणार”

दरम्यान, संबंधित प्रकार हा अहमदनगरच्या फकीरवाडा भागातील आहे. फकीरवाड्यात संदल उरूस उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्साहादरम्यान एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष आणि काही युवक औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजप नेते गोपीचंद पडळकरांकडून, शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका, म्हणाले…

मी उद्धव ठाकरेंसोबत राहणार होतो, पण… ; शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांचा मोठा खुलासा

नाशकात एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; सहा नेते अन् शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश