आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाकरे गटातील नेत्या दीपाली सय्यद यांनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दीपाली सय्यद आज संध्याकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या. यावेळी दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जवळपास अर्धा ते एक तास दिपाली सय्यद आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर दिपाली या वर्षा बंगल्याबाहेर दाखल झाल्या आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
माझी कुणावरही नाराजी नाही. कुणी कुठे आलं आणि कुणी कुठली जागा घेतलीय त्याच्यामुळे मी नाराज आहे, असं काहीही नाही. प्रत्येकाची जागा प्रत्येकजण स्वत:च्या मेहनतीने स्थापन करतं. त्यामुळे माझी नाराजी नाही, असं दिपाली सय्यद यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हे ही वाचा : मनसेसोबत युती करण्याबाबत शहाजीबापू पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मी गेल्या दिवसांपासूनच्या राजकीय घडामोडींदरम्यान राजकारणात सक्रिय आहे. काही गोष्टी प्लॅनिंग करायच्या असतात. काही कामं करायची असतात. ती कामं टप्प्याटप्प्याने पूर्ण करायचे असतात. त्याला आपण वेळ द्यावा लागतो. त्या कृतीतूनच लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तेच मी करत आहे आणि ते लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. प्रत्येकाची वेगळ्या पद्धतीची इच्छा आहे. पण आपण जे काम करतो त्या कामाला एक स्थान मिळतं. ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला आपला नेता सपोर्ट करत असेल तर मला असं वाटतं की आपण त्यांच्याबरोबर जायला हवं, असं दीपाली सय्यद यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का?; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले..
“आधी नाही म्हणाले, रागावले, चिडले, नंतर राज ठाकरेंनी जी कृती केली, त्याने सर्वांची मने जिंकली”