सत्तासंघर्षाच्या निकालाआधी मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देणार?; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्ट विधान, म्हणाले…

0
223

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लातूर : सर्वोच्च न्यायालय उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देण्याची शक्यता आहे, असे संकेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडन अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तासंघर्षाचा निकाला लागण्याआधीच राजीनामा देतील, असा दावा कायदेज्ञांकडून तसेच विरोधी पक्षाकडून केला जात आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “कर्नाटकमध्ये भाजपला मोठा धक्का, एक्झिट पोलनुसार, काँग्रेसची किती जागांवर मुसंडी?”

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देतील, असं म्हणणं हा मुर्खांचा बाजार आहे. मी यावर जास्त बोलू शकणार नाही, पण एकनाथ शिंदे राजीनामा का देतील? त्यांनी काय चूक केली आहे? असा सवालही फडणवीसांनी यावेळी केला. ते लातूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आम्ही आशादायी आहोत. कारण आमची बाजू मजबूत आहे. त्यामुळे योग्य निकाल येईल, अशी आमची अपेक्षा आहे. निकाल येईपर्यंत आपण थांबलं पाहिजे, त्यावर तर्क वितर्क लावणं, योग्य नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे. त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत., असंही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“एकनाथ शिंदे भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री”

“सुषमा अंधारेंनी फक्त एक दिवस राज ठाकरेंसमोर बसावं, मग त्यांना कळेल की…”

भाजप शिवसेना नगरसेवक भर सभेतच भिडले; नेमकं प्रकरण काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here