बंडखोरांना का थांबवलं नाही?; उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाले, मला ती माणसं…

0
344

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेसोबत बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. मात्र हे बंड नेमकं कशामुळं झालं, तसेच बंडखोर आमदारांना का थांबवलं नाही, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर आता खुद्द उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला अनेकवेळा विचारलं जातं, आमदार बंडखोरी करणार आहेत हे तुम्हाला कळलं नव्हतं का? तर मी त्यांना सांगायचो, हो कळलं होतं. तर काहीजण विचारतात मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? मी त्यांना म्हटलं कशासाठी थांबवू मी या लोकांना?, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.

हे ही वाचा : भाजपचा काँगेस – राष्ट्रवादीला मोठा धक्का; दिग्गज नेत्यांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जी माणसं विकली गेली आहेत त्यांना सोबत घेऊन मी ही लढाई कशी लढू? मला ती विकली गेलेली माणसं नकोत, मला लढाऊ माणसं हवीत. ही विकली गेलेली माणसं शिवसैनिक म्हणायच्या लायकीची नाहीत. मी सर्वांना बोलावून स्पष्ट शब्दात सांगितलं, दरवाजा उघडा आहे. ज्यांना थांबायचं त्यांनी थांबा, बाकीच्यांनी निघून जावं, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“शिंदेंचा आता मनसेला दणका; राज ठाकरेंच्या ‘या’ निष्ठावान नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

…म्हणून मी त्यावेळी डोळा मारला; अखेर अजित पवारांनी केला खुलासा

उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ठाकरे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याच्या पुत्राने केला शिंदे गटात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here