आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कपात केल्याचं समोर आलं आहे. याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहने आणि ‘मातोश्री’ निवासस्थान येथील सुरक्षा देखील कमी करण्यात आल्याचा दावा, ठाकरे गटाकडून करण्यात आला. यावरून आता मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ही बातमी पण वाचा : ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीची जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात पार
कोणत्याही प्रकारची सुरक्षा कपात करण्यात आलेली नाही, असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी यावेळी दिलं. याबाबत मुंबई पोलिसांतील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कोणतीही कपात करण्यात आली नाही. त्यांच्या ताफ्यात प्रत्येकी एक अतिरिक्त वाहन होते. ती वाहने हटवली आहेत.
मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात राहत असलेल्या ज्या व्यक्तींना संरक्षण आहे. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कपात करण्यात आली नाही, असं मुंबई पोलिसांनी एका निवेदनात सांगितलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
जागतिक MSME दिना निमित्त ‘उद्योग – व्यवसाय कर्ज कार्यशाळेचे’ आयोजन
मंत्रिमंडळ विस्तार करण्याची क्षमता सरकारमध्ये नाही; ‘या’ नेत्याचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर
“राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?; ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”