Home महाराष्ट्र “राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?; ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”

“राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?; ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : जवळपास एक वर्षाआधी, म्हणजेच 20 जून 2022 महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेत बंड केलं. आणि देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं.

शिंदेंनी केलेल्या बंडामुळे आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गद्दार दिन साजरा केला जात आहे. अशातच आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा, संजय शिरसाट यांनी यावेळी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : चुंबन पोझमध्ये फोटो काढताना नवऱ्याचा संयम सुटला, अन् …

भाजप आणि शिंदे गटात महाविकास आघाडीतून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. ठाकरे गटाच्या महिला आमदार मनीषा कायंदे यांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आगामी काळात भाजपमध्ये येतील., असा दावा संजय शिरसाटांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“काँग्रेसनं काढला विधानसभेच्या पराभवाचा वचपा, घरच्या मैदानावर, विखे पाटलांना मोठा धक्का”

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनीषा कायंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी…

देवेंद्रजी, हिंमत असेल तर…; उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान!