मुंबई : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते टी.व्ही.9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
महाराष्ट्रासाठी ईडीचा हा खेळ नवा नाही. भाजपाच्या विरोधात असणाऱ्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवली जात आहे. यातून केंद्र सरकार विरोधकांची बदनामी करून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे.
दरम्यान, तुमच्या ‘ईडी’च्या कारवाईला कोण घाबरतंय? असा सवालही यावेळी नवाब मलिक यांनी यावेळी केला. तसेच यापूर्वी ईडीने शरद पवार यांना नोटीस पाठवली होती. मग ती नोटीस मागे का घेतली? असा प्रश्नही नवाब मलिक यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी-
…तर उत्तर द्यावेच लागेल; ईडी नोटीसवरुन किरीट सोमय्यांचा राऊतांवर हल्लाबोल
“राज्य सरकारने संभाजी भिडेंना अटक करावी?”
काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्यासोबत येतील- रामदास आठवले
संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस