मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे.
समन्स व विचारण्यात आलेल्या प्रश्नांना एकनाथ खडसे योग्य प्रतिसाद देत आहेत. मग त्यांना अटकेची भिती का वाटते? असा प्रश्न उच्च न्यायालयाने ईडीला विचारला आहे. तसेच जर खडसे ईडीच्या चौकशीला सहकार्य करत असतील तर त्यांना अटक करण्याची काय गरज आहे? असाही प्रश्न न्यायालयाने ईडीला यावेळी केला.
दरम्यान, एकनाथ खडसेंनी एक याचिका दाखल करून आपल्यावर नोंदविला गेलेला इसीआयआर रद्द करणे तसेच सुनावणी होईपर्यंत तपास यंत्रणांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश न्यायालयाने द्यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. एकनाथ खडसे यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेवर ईडीने आक्षेप घेतला होता.
महत्वाच्या घडामोडी –
“महाबळेश्वर हादरलं! मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनावर शाळेतच बलात्कार”
“देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”
“अभिनेता रणबीर कपूर कोरोना पाॅझिटिव्ह?”
“तक्रार देण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय महिलेवर पोलिस उपनिरीक्षकाने केला बलात्कार”