Home महाराष्ट्र मोदी सरकारला बाळासाहेबांना पद्मविभूषण व भारतरत्न का द्यावसा वाटला नाही?; संजय राऊतांचा...

मोदी सरकारला बाळासाहेबांना पद्मविभूषण व भारतरत्न का द्यावसा वाटला नाही?; संजय राऊतांचा सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता.

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला आम्ही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अभिमानाने अभिवादन करतो. पण अभिवादन सोडा, त्यांच्यासाठी एक ट्वीट सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींकडून करुन दाखवा. त्यांना बाळासाहेबांच्या जयंतीला ट्वीट करायलाही लाज वाटते, अशी टीका फडणवीसांनी केली होती. यावरून आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : “मुंबई हादरली; वांद्रयात चार मजली इमारत कोसळली, 15 जण जखमी”

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने ट्विट केले नाही ही फडणवीस यांची वेदना आहे. मलाही त्यांची वेदना पाहून वेदना झाली. बाळासाहेब ठाकरेंना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव करावा असे यांच्या केंद्र सरकारला का वाटले नाही? असा सवाल संजय राऊतांनी यावेळी फडणवीसांना केला.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे भारतरत्न होतेच. तुमच्या केंद्र सरकारने बाळासाहेबांना पुरस्कार का दिला नाही, याचा खुलासा केला की, आम्हांला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ट्विटवर बोलता येईल, असा टोला संजय राऊतांनी यावेळी फडणवीसांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

धनंजय मुंडेंसमोरच आमदार चढले झाडावर; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्राकडेच द्या; चंद्रकांत पाटलांचा टोलो

“मुंबई महापालिका निवडणूकीत मनसे-भाजप युती नाही; भाजप स्वबळावर लढणार”