Home महाराष्ट्र इथे तांडव का नाही?; सामना अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपला सवाल

इथे तांडव का नाही?; सामना अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबई : तांडव या वेब सीरिजमधील एका दृश्यावर भाजपानं आक्षेप घेतला होता. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपाच्या नेते व कार्यकर्त्यांनी देशभरात दिग्दर्शक व निर्मात्याविरुद्ध ठिकठिकाणी गुन्हेही दाखल केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने अजच्या सामना मधून भाजपवर निशाणा साधलाय.

इथे तांडव का नाही?, असं म्हणत शेवसेनेने अर्णब गोस्वामी प्रकरणावरुन  भाजपवर टीका केली आहे.

‘तांडव’चे निर्माते व दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारात गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले, पण जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱ्या गोस्वामीविरोधातही भाजप असे गुन्हे जागोजागी दाखल करणार असेल तर ते खरे मर्द, असं शिवसेनेने सामनामध्ये म्हटलं आहे.

‘तांडव’मधील कोणत्या दृश्यांवर भाजपाचा आक्षेप आहे व तो का आहे यावर चर्चा व्हायला हरकत नाही, पण अर्णब गोस्वामीच्या देशद्रोहासंदर्भातदेखील चर्चा घडली तर पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा आत्मा शांत होईल, असं म्हणत शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“पराभव मान्य करा नाहीतर लोकंच तुडवतील एक दिवस”

…त्यामुळे मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात आहे- जयंत पाटील

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी

“धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची”