मुंबई : लोकसभेत मंजूर झालेल्या 127 व्या घटना दुरुस्तीबाबत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आणि धनगर समाजाला भाजपच आरक्षण देईल, असं भाजप नेते रावसाहेब दानवे वारंवार सांगत असतात. पण जेंव्हा 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवून राज्यांना आरक्षण देण्याच्या सूचनेवर संसदेत मतदान घेण्यात आलं, तेव्हा रावसाहेब दानवेंचं तोंड बंद का होतं?, असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्र सरकारने आणलेलं 102 वी घटना दुरुस्ती हे विधेयक अपुरं असल्याने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करून त्याचे अधिकार राज्यांना द्यावेत, अशी सूचना आम्ही केली होती. आम्ही जी दुरुस्ती सूचवली होती. ती संसदेत मताला टाकली असता, काँग्रेससह इतर पक्षांनी तिला पाठिंबा दिला. एकूण 71 खासदारांनी त्याला पाठिंबा दिला. पण भाजपने विरोध केला., असं राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, रावसाहेब दानवे काल तिथे होते. कोणत्याही परिस्थिीत भाजपच मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देईल असं सांगणारे दानवे तोंड गप्प करून बसले होते, असा हल्लाबोल राऊतांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
राज, उद्धव यांचं नका सांगू, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो- बच्चू कडू
“दारूच्या त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात, भाजपने त्या बाटल्या लॅबमध्ये पाठवाव्यात”
…तर मग हे शुद्धीत कसे असणार?; नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका