आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत शिवसेनेविरोधात बंड केलं. यानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. यावरून आता शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना का फुटली? का दोन मेळावे घ्यावे लागलं? यावर भाष्य केलं आहे.
शिवसेना का फुटली? का दोन भाग झाले? का दोन मेळावे घ्यावे लागलं? याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल, असं रामदास कदम यांनी म्हटलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : …तेंव्हा उद्धव ठाकरेंकडून ‘ती’ चूक झाली; एकनाथ खडसेंनी सांगितलं सविस्तर कारण
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक स्वत: येतील. त्यामुळे शिवसेना कोणाची याचा निर्णय न्यायालयाच्या आधी 5 तारखेला होणाऱ्या दसरा मेळाव्याला लागेल., असंही रामदास कदम म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेची ताकद असती, तर 50 आमदार आणि 12 खासदार आपल्याला सोडून गेले नसते. एक झेंडा, एक मैदान, एक विचार, एक नेता हे शिवसेना प्रमुखांच्या वेळी होते. राष्ट्रवादीतून भाड्याने आणलेल्या लोकांना नेते, उपनेते बनवून आमच्या अंगावर सोडलं जात आहे. त्याची सर्व उत्तर उद्याच्या मेळाव्यात मिळतील, असंही कदम म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तेंव्हा उद्धव ठाकरेंकडून ‘ती’ चूक झाली; एकनाथ खडसेंनी सांगितलं सविस्तर कारण
एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश