आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. या बंडामध्ये भाजपचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे बघा, हे सगळं जे कारस्थान आहे, त्याचा सूत्रधार कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे. दर दिवसाआड देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातात, अमित शाहांना भेटतात, नड्डांना भेटतात, आणखी कुणाला भेटतात…पुढची रणनीती आखतात., असा घणाघात पृथ्वीराज चव्हाणांनी यावेळी फडणवीसांवर केला.
हे ही वाचा : भाजपमध्ये हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल
दरम्यान, ईडीचं काय करायचं? कुणावर कसा दबाव टाकायचा? त्यानंतर साधनसामग्रीची व्यवस्था करतात. दर दोन दिवसाला हे सुरू आहे. त्यामुळे याचा सूत्रधार कोण आहे? याचा कर्ता करवीता कोण आहे? हे आता स्पष्ट झालं आहे. याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा बैठका झाल्या असतील, उद्या परवा पुन्हा बैठका होतील, असं चव्हाण म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! म्हैसाळमधील 9 जणांच्या आत्महत्याप्रकरणी मोठा खुलासा!
महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार; ‘या’ बंडखोर आमदारांचं मोठं विधान
एकनाथ शिंदे गट मनसेत सामील होणार?; आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले…