Home महाराष्ट्र भाजपमध्ये हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

भाजपमध्ये हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. याच पार्श्‍वभूमीवर भाजप नेत्यांनी भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत तातडीने बोलावलं आहे.

भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु असून सर्व अपक्ष आमदारांना देखील उद्या मुंबईत येण्याचे आदेश दिले गेले आहेत.

हे ही  वाचा : मोठी बातमी! म्हैसाळमधील 9 जणांच्या आत्महत्याप्रकरणी मोठा खुलासा!

मुंबईत भाजपच्या कोअर टीमची बैठक पार पडली. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार आहे.असं वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं असून शिंदे गट आगामी काळात काय भुमिका घेणार यायाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार; ‘या’ बंडखोर आमदारांचं मोठं विधान

एकनाथ शिंदे गट मनसेत सामील होणार?; आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले…

“… म्हणुन उचललेलं हे पाऊल”; एकनाथ शिंदेंनी केला बंडखोरीमागील खुलासा