आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी काही दिवासंपूर्वी मातोश्रीवर जाऊन हनुमान आरती म्हणणार असल्याचे म्हटले होते. पण त्याआधी त्यांना अटक झाली. आता जामीनावर सुटका झाल्यानंतर राणा दाम्पत्य दिल्लीत गेले आहेत. ते दिल्लीत कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत.यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.
राणा दाम्पत्य महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन आरती करणार होते. मग आता दिल्लीत त्यांनी पंतप्रधान कार्यालयात जायला हवे होते, असं सांगतानाच मुंबईत कोणत्याही मंदिरात जाऊन हनुमान आरती करण्यास अडवले नव्हते. मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न केला म्हणून हा सर्व राडा झाला. कोणाच्या घरी जाऊन तुम्ही अशी आरती करू शकत नाही. मंदिरात जाऊन तुम्ही करू शकता, असं विद्या चव्हाण म्हणल्या.
हे ही वाचा : “शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात, अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांकडून अटक”
मुख्यमंत्रीपदाचा एक सन्मान असतो. त्या खुर्चीचा मान ठेवायचा असतो. सध्या कोणी उठतो आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतो, असंही विद्या चव्हाण यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, कोण आहे नवनीत राणा, त्या बारमध्ये काम करत होत्या. त्यानंतर सी ग्रेड चित्रपटात काम केले. बोगस जात प्रमाणपत्र दाखवून खासदार झाल्या. त्या खऱ्या खासदार नाहीत, अशी टीका विद्या चव्हाण यांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींना संजय राऊतांचं जोरदार उत्तर, म्हणाले…
रायगडमध्ये शिवसेनाला मोठा धक्का; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला दोन वर्षांची शिक्षा
“केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये”